Kamshet : रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंबई-कोल्हापूर (महालक्षमी एक्सप्रेस) या रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री बाराच्या सुमरास कामशेत ते कान्हे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडली.

_MPC_DIR_MPU_II

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे 30 वर्ष आहे. उंची पाच फूट दोन इंच, अंगाने मजबूत, निमगोरा, केस काळे, दाढी-मिशा वाढलेल्या आहे. गुलाबी रंगाचा हाफ बरमुडा घातलेला आहे.

शनिवारी रात्री बाराच्या सुमरास मुंबई-कोल्हापूर (महालक्ष्मी एक्सप्रेस) या रेल्वेची धडक लागल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. कामशेत ते कान्हे या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. सदर व्यक्तीबाबत माहिती असल्यास तळेगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस बी तोडमल करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.