Kamshet : खडकाळे गावात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील खडकाळे गावात सुरु असलेल्या (Kamshet )एका जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कारवाई केली. यामध्ये बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 18) करण्यात आली.

बबन विठ्ठल केदारी (वय 48, रा. ताजे), संतोष दत्तात्रय गायकवाड (Kamshet )(वय 50, रा. कामशेत), अविनाश प्रकाश लोहार (वय 32, रा. कामशेत), बाळकृष्ण शांताराम शिंदे (वय 44, रा. कामशेत), मिलिंद आनंदा साळवे (वय 44, रा. चिखलसे), पंडित काशिनाथ मंदिलकर (वय 44, रा. कामशेत), शेखर रामदास बोडके (वय 30, रा. कामशेत), सदाशिव शंकर टाकळकर (वय 59, रा. बुधवडी), गणपत बाळकृष्ण शिंदे (वय 40, रा. कामशेत), मंगेश मारुती राणे (वय 40, रा. कामशेत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार रहीस मुलाणी यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : ‘राज्याला पूर्ण वेळ पर्यावरण मंत्री द्या’

लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना खडकाळे येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कार्तिक यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी बंद खोलीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 17 हजार 970 रुपये रोख रक्कम आणि 11 लाख 25 हजार 500 रुपयांचे इतर साहित्य असा एकूण 11 लाख 43 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, अंमलदार नितेश कवडे, रहिस मुलाणी यांच्या पथकाने केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.