Kamshet : तिकोणागडाकडे जाणाऱ्या­ एसटीवर किल्ले तिकोणागड असा उल्लेख करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- किल्ले तिकोनागडाकडे जाणाऱ्या एसटीवर किल्ले तिकोणागड अशी पाटी लावण्याची मागणी गडभटकंती दुर्गसवंर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या विषयीचे निवेदन एसटी महामंडळाच्या तळेगांव दाभाडे आगाराचे व्यवस्थापक तुषार माने यांना दिले. अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सध्या किल्ले तिकोणागडाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये, शिवभक्तांमध्ये वाढ होत आहे. काही पर्यटक एसटीचा प्रवास करत किल्ले तिकोनाला भेट देण्यासाठी येतात. किल्ले तिकोणागडापर्यंत पोहचण्याकरिता एसटीच्या काही बस उपलब्ध आहेत. परंतु, या बसच्या पाटीवर किल्ले तिकोणागड असा उल्लेख नसल्याने काही पर्यटकांना सदरची एसटी तिकोणागड येथुन जाते हे समजुन येत नाही. त्यामुळे पर्यटकांना खासगी वाहनाने धोकादायकरित्या प्रवास करत जास्त पैसे देत गडापर्यंत पोहचावे लागते.

त्यामुळे किल्ले तिकोनागडाकडे जाणाऱ्या एसटीवर किल्ले तिकोणागड अशी पाटी लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच शनिवार व रविवार पर्यटकांच्या सोयीकरिता पवनानगर येथे जाणारी एसटी पुढे किल्ले तिकोणागडापर्यंत न्यावी किंवा गडापर्यंत विशेष एसटी सोडण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. त्याप्रमाणे एसटी बसवर ‘किल्ले तिकोणगड’ असा उल्लेख केला जाईल असे आश्वासन तळेगांव दाभाडे आगाराचे व्यवस्थापक तुषार माने यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.