Kamshet : कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- भरधाव कंटेनरच्या धडकेमध्ये पादचारी वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात कामशेत गावच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पवना फाट्यावर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता झाला.

हरणाबाई मारुती शिंदे ( वय 68, रा. कामशेत ) असे या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी साडेदहा वाजल्याच्या सुमारास पुण्यावरून मुंबईच्या दिशेने चाललेला कंटेनर ( एम एच 43 बीजी 9539 ) कामशेत येथील पवना फाट्यावर आला असता हरणाबाई शिंदे याना कंटेनरची धडक बसली. त्यांच्या दोन्ही पायांवरून कंटेनरचे उजव्या बाजूचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर सोमाटने येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंटेनर चालक नरेंद्र प्रसाद दिवेदी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.