Kamshet : कामशेत मधील कचरा प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज- कामशेत मधील शिवाजी चौक परिसरात कचर्‍याचे ढिग मोठ्या प्रमाणवर साचले असून नागरिकांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्येला सामोरं जावे लागत आहे.

ग्रामपंचायत कचरा उचलत नसल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्याचा दुर्गंध संपूर्ण परिसरात पसरला आहे. ग्रामपंचायत सदस्य व संबधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन कचरा उचलण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.