Kamshet : मिठाईचे दुकान जळून खाक

एमपीसी न्यूज –  शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील एका मिठाईच्या दुकानाला आग लागुन संपूर्ण दुकान जळुन खाक झाले . शहरातील मुख्य चौकात असलेल्या या मिठाईच्या दुकानाला बुधवार ( दि. 26 ) रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज दुकान मालक खरताराम चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

रात्री बारा वाजण्याच्या सुमारास स्वीट होम दुकानातून शेजारील दुकानाच्या वर राहणाऱ्या मोबाईल शॉपी मालकास धूर येताना दिसले. त्याने या संदर्भात स्वीट होम मालकास संपर्क करून माहिती दिली. मोठ्या धाडसाने कामशेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीलकंठ जगताप , राम कानगुडे , महेंद्र वाळुंजकर व इतर पोलीस कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकेश मुथा , गणेश भोकरे , बाळासाहेब जाधव , प्रमोद पवार , शंकर काजळे यांच्या सह स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी साखळी करून पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा अटोकाट प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही. मात्र दुकानाच्या बाहेर आणि आजूबाजूला आग पसरली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र दुकानातील सर्व समान जाळून खाक झाले. यावेळी अग्निशामक दलाचे लोणावळा आणि तळेगावमधून असे दोन बंब आल्यानंतर सुमारे पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. परंतु तो पर्यंत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले होते.

यावेळी आजू बाजुला असलेल्या मोबाईल शॉपी , हॉटेल आणि इतर ठिकाणी आग पसरण्याची भीती असताना डॉ . विकेश मुथा यांनी आपला वीज धोक्यात घालून त्यांच्या सहकारी व पोलिसांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांनी सांगितले. शिवाय बाजूला असलेल्या दुकानदारांनी प्रसंगावधान दाखवुन शेजारील इमारतीवर चढून बादलीच्या साहाय्याने पाण्याचा मारा केला व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत स्वीट होम मालकाचे अंदाजे पाच लाखाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. बुधवारी सकाळी वीज कामशेत वितरण मंडळाचे सहाय्यक अभियंता विनोद राणे यांनी दुकानाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले कि आग ही शॉक सर्किटमुळे लागली नसावी दुकानातील पेटता दिवा किंवा अन्य काही कारणामुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.