Kamshet : तिकोना गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरावर पत्रे

गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेचा उपक्रम

एमपीसी न्यूज- गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने तिकोना गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरावर कौलासारखे दिसणारे उच्च प्रतीचे पत्रे टाकण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

किल्ले तिकोणागडाच्या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. गडावर वितंडेश्वराचे मंदिर असुन या मंदिरावरील पत्रे जुने झाल्यामुळे मंदिरात पावसाळ्यात कायम पाणी गळत असे. त्यामुळे मंदिराच्या भिंतीवर शेवाळ जमा होऊन मंदिरात पाणी साठत असे.

गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या शिवप्रेमी सदस्यांनी पुढाकार घेऊन रविवारी भर पावसामध्ये कौलासारखे दिसणारे उच्च प्रतीचे पत्रे टाकण्याचे काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.