Kamshet : तंत्रज्ञानाचा वापर करत जपली परंपरा; बाळावर बारशाचे केले ऑनलाईन संस्कार

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच चैन ब्रेक करण्यासाठी ‘जनता कर्फ्यु’चे रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत काटेकोर पालन करण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तर पाटण गावात नवजात बालकावर (बारशाचे) ‘बारावी’चे संस्कार चक्क ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

पारंपरिक चालीरीतीनुसार बालकाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवीचा पाटा पुजन करतात तर बाराव्या दिवशी बारशाचे (बारावीचे) पूजन केले जाते. कुटे कुटुंबातील या बालकाला जन्मानंतर पाचव्या दिवशी घरातील मंडळींनी मुलाच्या आजोळी जाऊन पाचविचा पाटा पूजन केले परंतु रविवारी ‘जनता कर्फ्यु’ असल्याने व तो सर्वांच्या सुरक्षितेसाठीच असल्याची जाणीव ठेवत कुटे कुटुंबीयांनी मुलाच्या आजोळी व्हाट्सअप्प व्हिडीओ कॉल करत बारावीची विधिवत पूजा केली.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘जनता कर्फ्यु’ रविवारी लागू होणार असुन आपण त्यात सहभागी होणे गरजेचे आहे, असे असताना नवजात बालकावर बारशाचे संस्कार करण्यासाठी काय करता येईल. या विचारात असताना आधुनिकतेची जोड देत परंपरा साजरी करता येईल, हा विचार घेऊन कुटे कुटुंबीयांनी दोन दिवस आधीच बारशाचा विधी करण्यास लागणारे साहित्य मुलाच्या आजोळी पाठवून दिले. बारशाच्या मुहूर्तावर मुलावर व्हाट्सअप्पच्या माध्यमातून संपर्कात येत विधिवत पुजाही केली. मावळ तालुक्यात व्हाट्सअप्पच्या माध्यमातून झालेली ही पहिलेच बारसे असेल.

लहान मुले व वयोवृद्ध यांना कोरोनाच्या संसर्ग लवकर होत असल्याने तसेच त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याने आम्ही परंपरा न मोडता आधुनिक पद्धतीने विधिवत पुजा करत बारसे केली असल्याचे मुलाची आजी अनिता कुटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.