सोमवार, डिसेंबर 5, 2022

Kamshet : विजेच्या लपंडावामुळे व्यापारी, नागरिक हैराण

एमपीसी न्यूज – कामशेतमध्ये (Kamshet) मागील आठवडा भरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोज किमान आठ ते दहा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने कामशेतमधील हॉटेल व्यवसायिक, बेकरी, कॉम्पुटर क्लासेस, डॉक्टर तसेच कापड व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि नागरिक हैराण झाले आहेत. वीज, वारा, पाऊस असे काहीही नसताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

प्रशासनाचे (Kamshet) ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. येथे रोज 8-10 तास वीज जात आहे. त्यामुळे कामशेतमधील नागरिकांची कामे खोळंबली आहेत. पाऊस, वारा काहीही नसताना रोज वीज का घालवत आहेत याचा नागरिकांना आणि व्यापारी वर्गाला प्रश्न पडला आहे. याबाबत कार्यवाही होईल का? विजेचा लपंडाव थांबेल का? की, नागरीकांनी रस्त्यावर उतरून याबाबत निषेध व्यक्त करायची वेळ आलेली आहे? अशी संतापजनक चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Kamshet Accident : कामशेत-नाणे येथील रस्ता खचल्याने डंपर पलटी, रस्ता दर्जेदार नसल्याने अपघात

Latest news
Related news