Kamshet : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक

एमपीसी न्यूज- कामशेतमधील मच्छी मार्केट चौकात दोन जणांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गुरुवारी ( दि. 6) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

जावेद शब्बीर शेख (वय 34 रा.साई समर्थ कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड ) , आफताब अल्ताफ पिरजादे ( वय 21 रा. साई मंदिराजवळ ओम कॉलनी नं 2 , बिजलीनगर, चिंचवड ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत शहरातील मच्छी मार्केट चौकात पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास रात्रीची गस्त संपवुन पोलीस हवालदार समीर शेख व अजय दरेकर जात असताना जावेद शेख, आफताब पिरजादे यांची हालचाल संशयास्पद आढळुन आली. यावेळी त्यांची अंगझडती घेतल्यावर जावेद शब्बीर शेख याच्याकडे 16 इंची धारदार लोखंडी कोयता सापडला. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.