Kamshet : राहत्या घरात गळफास घेऊन एका तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

ऋषिकेश प्रकाश कदम (वय 20, रा. कामशेत गावठाण, ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रोहित सुरेश कदम (वय 20, रा. कामशेत, ता. मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ऋषिकेश आणि फिर्यादी रोहित हे चुलतभाऊ आहेत. रोहित यांचे वडगाव मावळ येथे आधारकार्ड केंद्र आहे. यामध्ये दोघेही काम करतात. धूलिवंदननिमित्त मंगळवारी आधारकार्ड केंद्राला सुट्टी होती. सकाळी ऋषिकेश मोबाईल घेऊन आपल्या खोलीत गेला. काही वेळाने ऋषिकेशच्या आजीने दरवाजा वाजवला असता त्याने दरवाजा उघडला नाही.

ऋषिकेशच्या आजीने रोहितला याबाबत सांगितले. रोहितने दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद न आल्याने रोहितने दरवाजा तोडला. त्यावेळी ऋषिकेशने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.