Kamshet : पूर्ववैमनस्यातून तरुणावर भर दिवसा वार

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असलेल्या तरुणावर पूर्ववैमनस्यातून वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाकड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी बाराच्या सुमारास पंचशील कॉलनी, कामशेत येथे घडली.

दिनेश दिलीप शिंदे (वय 28 , रा. गावठाण कामशेत) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जखमी दिनेश शिंदे आज दुपारी बाराच्या सुमारास कामशेत मधील पंचशील कॉलनी मधून पवनानगर रोडकडे जात होता. त्याच्या भावाने पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीबाबत भावाला समजावून सांग असे म्हणत एकाने त्याच्या पाठीवर आणि हातावर वार केले. यामध्ये दिनेश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी कामशेत येथे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी वाकड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.