Talegaon : उर्से ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांचन धामणकर बिनविरोध

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे- मावळ तालुक्यातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणा-या उर्से ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांचन सुभाष धामणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष धामणकर यांच्या त्या पत्नी आहेत.

याआधीच्या सरपंच अश्विनी शिंदे यांनी कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

धामणकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कालेकर व मेकाले भाऊसाहेब यांनी कांचन धामणकर यांच्या नावाची घोषणा केली. सहाय्यक म्हणून मनिषा पवार (तलाठी) यांनी काम पाहिले.

त्यावेळी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, उपसरपंच पै. प्रदीप मारुती धामणकर, पोलीस पाटील गुलाब आंबेकर, सदस्या उर्मिला धामणकर, शांताबाई धामणकर, इंदुबाई पवार, सुरेखाताई थोरात, बाळू धामणकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, माजी उपसरपंच जालिंदर धामणकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सचिन भेगडे, कान्हे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अभिजीत सातकर, उर्से ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयसिंग ठाकूर, सदस्य उत्तम पोटवडे, सुलतान मुलाणी, रोहिदास धामणकर, सदस्य भरत कारके, प्रगतीशील शेतकरी मारूती धामणकर आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरपंच धामणकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.