Talegaon Dabhade News : मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी कांचन सावंत यांची निवड

एमपीसी न्यूज – मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ मावळ  (Talegaon Dabhade News) तालुका अध्यक्षपदी साहित्यिका कांचन सावंत तर सचिवपदी पत्रकार प्रशांत पुराणिक यांची निवड झाली आहे. मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुढील तीन वर्षाकरिता कार्यकारिणी घोषित करण्यात आली. 
नवीन कार्यकारिणीमध्ये श्रीकृष्ण मुळे (कार्याध्यक्ष), रमेश चंद्रात्रेय (उपाध्यक्ष),माधवी खडककर (कोषाध्यक्ष) यांचेसह राधिका भोंडे, नीता काळोखे, अशोक  काळोखे, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, अनुप्रिया खाडये, रश्मी थोरात, कविता जोशी, १८ जणांचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. यावेळी मावळ तालुक्यात मराठी साहित्याविषयी सर्वांमध्ये आवड निर्माण व्हावी या करीता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणार असल्याचे सावंत म्हणाले.
यावेळी मंडळाचे मुख्य विश्वस्त सुरेश साखवळकर, प्रा. जयंत जोर्वेकर, राजन लाखे, डॉ. पांडुरंग भानुशाली यांच्यासह प्रभाकर ओव्हाळ, मुग्धा जोर्वेकर डॉ. विनया केसकर, आशिष पाठक उपस्थित होते.
सूत्रसंचलन अर्चना मुरुगकर यांनी केले. आभार श्रीकृष्ण मुळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.