Kangana Backs Arnab : इतिहास अर्णब गोस्वामीला हिरो म्हणून लक्षात ठेवेल – कंगना राणावत 

एमपीसी न्यूज – अर्णब गोस्वामी यांना जितकं टॉर्चर केलं जाईल ते तितके कणखर होऊन बाहेर येतील. तसेच, त्यांची लोकप्रियता आणखी वाढत जाईल व इतिहासात अर्णब यांना हिरो म्हणून ओळखलं जाईल, असं म्हणत कंगना राणावतने पत्रकार अर्णब गोस्वामी यांची पाठराखण केली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

अर्णबच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुढे आली असून कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत कंगनाने बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीया, चाईल्ड ट्रॅफिकिंग आणि सोनिया गांधी यांचं खरं नाव घेतल्यामुळे टॉर्चर केलं जात असल्याचं म्हटलं आहे.

अधिकतर लोकांना अर्णब यांना का अटक केली आहे, हे सुद्धा माहित नाही. अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या नावावरुन अर्णब यांना अटक केली आहे. पण फॅसिस्ट सरकारने अर्णब यांना अटक करुन सर्वात लोकप्रिय पत्रकार केले आहे, अशी टिप्पणी कंगनाने केली आहे.

अर्णब गोस्वामी यांना जितकं टॉर्चर केलं जाईल ते तितके कणखर होऊन बाहेर येतील. तसेच, त्यांची लोकप्रियता आणखी वाढत जाईल व इतिहासात अर्णब यांना हिरो म्हणून ओळखलं जाईल’ असं, कंगनाने या व्हिडीओत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.