Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणावतला कोरोनाची लागण
एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला कोरोनाची लागण झाली आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
कंगणाने मेडीटेशन करत असल्याचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यात थोडी जळजळ होत होती तसेच थकल्यासारखे आणि अशक्त वाटत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी कोरोना टेस्ट केली तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजले. मी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे, मला कल्पना नव्हती की या विषाणूने माझ्या शरीरात शिरकाव केला आहे. मला माहिती आहे की मी विषाणूला हरवेन.’
‘कृपया तुमच्यावर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होऊ देवू नका. ज्या गोष्टीपासून तुम्ही जास्त घाबरलात ती गोष्ट तुम्हाला अधिक घाबरवेल. उगाचच आपण त्याला जास्त महत्त्व दिले आहे. हा केवळ एक छोटासा फ्लु आहे. चला तर मग आपण सगळे मिळून कोविड 19 ला नष्ट करूया, हर हर महादेव’.. अशी पोस्ट कंगनाने लिहिली आहे.