kangana ranaut : रणबीर, रणवीर, विकी व अयान यांनी ड्रग चाचणीसाठी रक्ताची तपासणी करावी – कंगना राणावत 

एमपीसी न्यूज – सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी कंगना राणावतने बॉलिवूड सेलिब्रिटींवर आरोप करण्याचं सत्र सुरूच ठेवलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर कंगनाने आता बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वापरावर खुलासा केला आहे. कंगना राणावतने पीएमओला टॅग करत एक ट्वीट केलं आहे.

कंगना राणावतने केलेल्या या ट्वीट मध्ये तिने रणवीर सिंह, विक्की कौशल, रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी यांना ड्रग टेस्टसाठी ब्लड सॅम्पल्स देण्यासाठी सांगितलं आहे. कंगनाने ट्वीट केलं आहे की, ‘मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विक्की कौशल यांच्याकडे विनंती करते की, त्यांनी आपले ब्लड सॅम्पल्स ड्रग्ज टेस्टसाठी द्यावेत. अशी अफवा आहे की, तुम्ही सगळे कोकेनच्या आहारी गेला आहात. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही या अफवा खोट्या ठरवाव्यात. जर, या सर्व स्टार्सचे सॅम्पल्स नॉर्मल आले, तर यामुळे लाखो तरुण प्रेरित होतील.’ असे ती म्हणाली.

_MPC_DIR_MPU_II

कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, बॉलिवूडमध्ये 99 टक्के लोक ड्रग्ज घेतात. इंडस्ट्रीच्या पार्ट्यांमध्ये खुलेआम ड्रग्स, कोकेन, गांजा इत्यादींचं सेवन खुलेआम केलं जातं. कंगनाने हा खुलासा केल्यानंतर बॉलिवूडच्या कोणत्याही सेलिब्रिटीने एकही रिअ‍ॅक्शन दिली नाही. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.