Kangana Ranaut : आदित्य ठाकरेंच्या स्पष्टीकरणावर कंगना राणौतची टीका ; विचारले सात प्रश्र्न 

Kangana Ranaut's criticism of Aditya Thackeray's explanation; Seven questions askedKangana Ranaut's criticism of Aditya Thackeray's explanation; Seven questions asked Kangana Ranaut's criticism of Aditya Thackeray's explanation; Seven questions asked.

एमपीसी न्यूज – सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे असे स्पष्टीकरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. मात्र, बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने टीका केली आहे.

कंगना राणौतने ‘घाणेरड्या राजकारणाविषयी कोण बोलतंय बघा? तुमचे वडिल मुख्यमंत्री कसे झाले, ही घाणेरड्या राजकारणाची केस स्टडी आहे. ते सगळं विसरा आणि तुमच्या वडिलांना याबद्दलचे काही प्रश्न विचारा,’ असं ट्विट टिम कंगनाने केलं आहे.

‘हे’ आहेत ते सात प्रश्र्न

1) रिहा चक्रवर्ती कुठे आहे?

2) सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी एफआयआर का घेतली नाही?

_MPC_DIR_MPU_II

3) सुशांतच्या जीवाला धोका असल्याची तक्रार फेब्रुवारीमध्ये दाखल केल्यानंतरही मुंबई पोलीस पहिल्या दिवशीच ही आत्महत्या आहे, हे कसं म्हणत होते?

4) आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट का नाहीत? सुशांतचा खून झाला त्या आठवड्यात तो फोनवर कोणाशी बोलला याचा डेटा का नाही?

5) आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाईनच्या नावावर बंदिस्त का ठेवण्यात आलं?

6) सीबीआय चौकशी बाबत एवढी भिती का ?

7) रिहा आणि तिच्या कुटुंबाने सुशांतचे पैसे का लुटले?

या प्रश्नांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे याची उत्तरं द्यावीत, अशी मागणी कंगना राणौतने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.