Kangana Supports Vidyut: टि्वटरयुद्धात कंगनाचा विद्युतला पाठिंबा

Kangana Supports Vidyut: Kangana Supports Vidyut Jammwal in Twitter War हॉटस्टारने आयोजित केलेल्या या डिजिटल कॉन्फरन्समध्ये अभिषेक बच्चन, अजय देवगन, आलिया भट्ट, वरुण धवन आणि अक्षय कुमार यांना बोलावलं होतं.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनमुळे सध्या चित्रपटगृहे बंद आहेत. अशावेळी सर्व प्रक्रिया करुन प्रदर्शनासाठी तयार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांनी प्रदर्शनासाठी आता ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला आहे.

याच दरम्यान डिस्ने हॉटस्टारने एका ऑनलाईन कॉन्फरन्सच्या माध्यमातून आगामी सात चित्रपटांची घोषणा केली. मात्र ही कॉन्फरन्स चित्रपटांपेक्षा त्यात सामील न केल्या गेलेल्या कलाकारांमुळेच जास्त चर्चेत आहे.

अभिनेता विद्युत जामवालने टि्वटरद्वारे या कॉन्फरन्सवर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या या टि्वटला आता अभिनेत्री कंगना राणावतने पाठिंबा दिला आहे. तिने देखील हॉटस्टारवर शरसंधान केले आहे.


‘किती शरमेची बाब आहे, एक आऊटसाइडरला अशा प्रकारे ट्रीट केलं जातंय. दु:खाची बाब म्हणजे स्वत: एक आऊटसाइडर असतानाही त्यांच्याकडून अशी वागणूक मिळतेय’, अशा आशयाचे ट्विट करुन कंगनाने नाराजी व्यक्त केली होती.

हॉटस्टारने आयोजित केलेल्या या डिजिटल कॉन्फरन्समध्ये अभिषेक बच्चन, अजय देवगन, आलिया भट्ट, वरुण धवन आणि अक्षय कुमार यांना बोलावलं होतं.

यावर विद्युत जामवाल संतापला होता. ‘ही नक्कीच एक मोठी घोषणा आहे. सात चित्रपट प्रदर्शित होणार आणि पाचच प्रतिनिधींना तुम्ही बोलावलतं. दोन चित्रपट आणखी आहेत त्यामधील कलाकारांना तुम्ही विसरलात’, अशा आशयाचे ट्विट करुन विद्युतने आपली नाराजी व्यक्त केली होती. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.