Delhi News : कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

एमपीसी न्यूज – जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता व सीपीआय नेता कन्हैया कुमार आणि आरडीएएमचा गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी काँग्रेस पक्षात सामील होणार आहेत. 28 सप्टेंबर रोजी दोघेही कॉंग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.

कन्हैया कुमारने काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे त्याने पक्षात प्रवेश केल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र आता ह्या अफवांना पूर्णविराम लागला आहे. कन्हैया कुमार बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात सामील होणार आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) चा सदस्य असलेला कन्हैया कुमार हा त्याच्या भडक भाषणांसाठी, विशेषत: जेएनयूच्या दिवसातील भाषणांसाठी ओळखला जातो. त्याने बेगूसराय मतदारसंघातून 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपा नेते गिरीराज सिंह यांच्या विरोधात लढवली होती, मात्र कन्हैया कुमार निवडणुकीत गिरीराज सिंह यांच्याकडून पराभूत झाला होता.

दरम्यान, एकीकडे कन्हैया कुमार काॅंग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार असून आरडीएएमचा गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी सुद्धा काँग्रेस पक्षात सामील होणार आहेत, त्यामुळे राजकीय पटलावरचा हा बदल नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.