Kanhe: ढाब्यावर थांबलेल्या ट्रेलरचालकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – ढाब्यावर थांबलेल्या एका ट्रेलर चालकावर दोन ते तीन जणांनी खुनी हल्ला केला. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. हा प्रकार आज (शनिवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास कान्हेफाटा येथे घडला.

हल्ल्यात जखमी झालेल्या ट्रेलरचालकाचे आडनाव यादव (पूर्ण नाव समजू शकले नाही) आहे. त्यांचे वय अंदाजे 41 आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कान्हे फाटा हद्दीतील एका पेट्रोल पंपा नजीकच्या ढाब्यावर आज दुपारी एम.एच 46 एच 4098 हा ट्रेलर थांबला होता. त्यावेळी तिथे आलेल्या दोन ते तीन अज्ञातांनी या ट्रेलरचालकावर धारधार हत्त्यारांनी खुनी हल्ला केल्याचे, प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

यामध्ये जखमी झालेल्या ट्रेलर चालकाला उपचारासाठी कामशेत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.