Kanhe : स्व.पै.पंढरीनाथ हरीभाऊ सातकर ग्रंथालय आणि वाचनालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – स्व. पै. पंढरीनाथ हरीभाऊ सातकर प्रतिष्ठानच्या वतीने कान्हे येथे सुरू करण्यात आलेल्या सुसज्ज ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. कान्हे (मावळ) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर विद्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे लोकार्पण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर होते. तसेच यावेळी महिंद्रा कंपनीचे अनिल जंगले, दिवाकर श्रीवास्तव, ज्येष्ठ नेते यादवेंद्र खळदे, माजी उपसरपंच सागर येवले, प्रदीप ओव्हाळ, विष्णू सातकर, मदन शेडगे, पूनम सातकर, भारती सातकर आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस व माजी उपसरपंच किशोर सातकर यांनी स्व पै पंढरीनाथ हरीभाऊ सातकर यांच्या नावाने सुसज्ज ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचा कान्हे गावासह पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयोग होणार आहे. यावेळी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिवंगत जनार्दन माळी यांना मरणोत्तर शिक्षक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रज्ञा जगताप व शुभांगी माळी यांनी पुरस्कार स्विकारला. त्याच बरोबर प्रा. काळे, शोभा वहिले व सुरेश पाटील यांनाही शिक्षक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. वडगावमध्ये झालेल्या नगराध्यक्ष चषक कुस्ती स्पर्धेतील विजेती सावरी सातकर हिचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते प्रा गणेश शिंदे यांचे व्याख्यान झाले. प्रास्ताविक किशोर सातकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रतीक सातकर यांनी केले. विकास सातकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.