Kanhe News : वाढदिवसाचा खर्च टाळून वृद्धाश्रमात केले अन्नदान

एमपीसी न्यूज – वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून भूषण सातकर यांनी किनारा वृद्धाश्रमात अन्नदान केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सातकर यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांना जेवण आणि गोड पदार्थ खाऊ घातले. कान्हे गावाचे भुषण सातकर हे युवा उद्योजक आहेत.

भूषण सातकर यांनी वाढदिवासाला वायफळ खर्च करता सामाजिक बांधिलकी जपत आहिरवडे येथील किनारा वृद्धाश्रमाला अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी (दि.11) वृद्धाश्रमात अन्नदान केले आणि आजी आजोबांची विचारपूस केली.

यावेळी तन्मय सातकर, मोंटी आगळमे, रणजीत सातकर, साहिल सातकर, ओम सातकर, कुमार भोंगाडे, हर्षद चव्हाण, गौरव बालघरे, संग्राम मराठे, अपुर्व आगळमे, सुयश मालपोटे, अमित मालपोटे, आदि चव्हाण, सर्वेश पिपळे, वैभव चव्हाण, नवघणे आदी उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.