Yamai mata : कन्हेरसर येथील यमाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज :  कन्हेरसर (ता. खेड) येथील यमाई मातेच्या दर्शनासाठी नवरात्र निमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असताना दिसत आहे. (Yamai mata) मंदिर गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली आहे. तसेच देवीला आकर्षक असे अलंकार, वस्त्र व पुष्पहाराने सजवण्यात आले आहे.

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी भरती संदर्भात महत्वाचे आवाहन

भाविक भक्त देवीच्या चरण पादुकांवर हळद कुंकू वाहत हार, पुष्प,श्रीफळ देवीला अर्पण करत होते. श्री यमाई देवी शारदीय नवरात्र महोत्सव 2022 निमित्त मंदिरा मध्ये धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. (Yamai mata) दि.3 रोजी रात्री 9 ते 12 वा. होम हवन संपन्न होणार आहे. दि.5 (दसरा)रोजी सायं. चार वा.देवीची भव्य पालखी मिरवणूक होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.