Chiranjeevi Sarja Passes away : कन्नड स्टार चिरंजीवी सरजाचं 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Kannada star Chiranjeevi Sarja dies of heart attack at 39 कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक चिरंजीवी सरजा याचं आज दुपारी निधन झालं. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी चिरंजीवी सरजाचं निधन झालं.

एमपीसी न्यूज – कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक चिरंजीवी सरजा याचं आज दुपारी निधन झालं. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी चिरंजीवी सरजाचं निधन झालं.  

मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीवीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनंतर त्याला बंगळुरु येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने चिरंजीवी सरजाचं निधन झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिरंजीवी सरजाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र हृदयविकाराचा झटक्याने त्याचं निधन झालं. चिरंजीवीच्या निधनाची माहिती मिळताच कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

चिरंजीवी सरजाने 2009 मध्ये ‘वायुपूत्र’ सिनेमातून आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. त्याने 20 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला होता. दक्षिण सिनेसृष्टीतील स्टार अर्जुन सरजाचा पुतण्या आणि अॅक्शन राजकुमार ध्रुव सरजाचा चिरंजीवी सरजा भाऊ होता. चिरंजीवी सरजाने चंद्रलेखा, औतार, भारजारी, सेजियर, अम्मा आय लव्ह यू, सिंजंगा इत्यादी सिनेमांमध्ये अभिनय केला होता. शिवार्जुन हा चिरंजीवी सरजाचा शेवटचा सिनेमा ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.