Kanpur Encounter: गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात डीवायएसपीसह 8 पोलीस शहीद

Kanpur Encounter: 8 Police personnel lost their lives after being fired upon by criminals या गुंडांनी पोलिसांना चहुबाजूंनी घेरले होते. पोलिसांना असा हल्ला होईल, असे वाटले नव्हते.

एमपीसी न्यूज- उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांच्या एका पथकावर गुंडांच्या टोळीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह 8 पोलीस कर्मचारी शहीद झाले. उत्तर प्रदेश पोलिसांवरील हा मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी हे पथक गेले होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे यूपी पोलीस हादरले आहे. एसटीएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

विकास दुबेला पकडण्यासाठी जेव्हा पोलीस पोहोचले. त्यावेळी दुबेचे गुंड आधी पासूनच पोलिसांची वाट पाहत बसले होते. पोलिसांनी कारवाई करण्याआधीच या गुंडांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरु केला.

या गुंडांनी पोलिसांना चहुबाजूंनी घेरले होते. पोलिसांना असा हल्ला होईल, असे वाटले नव्हते. दरम्यान, विकास दुबे पसार झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी राज्याच्या सर्व सीमा सील केल्या आहेत.


कानपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांच्या या पथकात एक सीओ, एक एसओ, 2 एसआय आणि 4 जवान शहीद झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

ही घटना रात्री उशिरा सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली. एकाही पोलीस कर्मचाऱ्याकडे सुरक्षा साहित्य नव्हते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.