PimpleSaudagar : येथे मान्यवरांच्या हस्ते कराटे चँपियन्सचा सन्मान

एमपीसी न्यूज – निगडी येथे झालेल्या युनिव्हर्सल शोतोकन आयोजित 24 व्या डो जो कराटे कुमीते चॅम्पियनशिप 2019-20 स्पर्ध्येमध्ये यशस्वी स्पर्धकांचा सन्मान नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी खेळाडूना मार्गदर्शन केले. यावेळी काटे म्हणाले, खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो. तसेच मुलांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळायला हवेत. आपल्या परिसरातील अनेक खेळाडू चांगल्या प्रकारे घडावेत आणि राज्य तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उज्वल करावे.

या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक -गोल्ड पदक विजेते मंदार ठाकरे, अवनी गजेंद्रगढ़, सिल्व्हर पदक विजेते -निलय सांगळे, उत्तेजनार्थ -अद्वैत मराठे, हर्ष पाटील, सिल्वर पदक -शिया आणि ब्रॉन्झ पदक -अथर्व केसरी, अमोघ चिंचोलीकर आदी उपस्थित होते. यावेळी कुंदन इस्टेटचे चेअरमन कुलदीप देशमुख, योगेश जाधव, भूषण सोनोने, राजेश पाटील, ऋषी पाटील, सुनिल कामदे, कुंदन इस्टेटमधील सभासद नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.