Fursungi : सोनार पूल येथे कठडा तोडून कार पाण्यात कोसळली; कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – फुरसुंगीत सोनार पुलावरून कठडा तोडून एक सँट्रो कार पाण्यात कोसळली. यामध्ये एका कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा अपघात आज (रविवार) पहाटे घडला.

नितीन कुंभार, (वय 48, राहणार – सासवड), असे मयत कराटे शिक्षकाचे नाव आहे. नितीन हे आपल्या कारमध्ये एकटे लोणीवरून फुरसुंगी येथे जात असताना ही घटना घडली. पोलिसांना सकाळी 6.55 ला या घटनेची माहिती मिळाली. तो पर्यंत तेथील नागरिकांनी मिळून वर काढले होते. अपघाताचे कारण आद्यत स्पष्ट झालेले नसून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.