Kareena-Saif Expecting Second Child: ‘कुणीतरी येणार येणार गं…’

Kareena Kapoor, Saif Ali Khan confirm they are expecting second child 'आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद'

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर एका गोष्टीची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. त्या चर्चेला आता होकार मिळाला असून सर्वांची लाडकी बेबो म्हणजे करीना कपूर खान दुस-यांदा आई होणार आहे. तिच्या आणि सैफच्या दुस-या अपत्याच्या बातमीला पीआर टीमने दुजोरा दिला आहे. तैमूरला लवकरच छोटा भाऊ किंवा बहीण मिळणार आहे.

सैफच्या पीआर टीमने सैफ व करीनाच्या वतीने याबद्दलची माहिती दिली. ‘आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद’, असे सैफ आणि करीनाने म्हटले आहे.

करीनाने 2018 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, सैफ आणि ती 2020 मध्ये दुस-या बाळाचे प्लानिंग करणार आहेत. तर यावर करीनाचे वडील रणधीर कपूर म्हणाले होते, ‘आशा करतो की ही बातमी खरी ठरो. मी खूप आनंदी असेल. दोन मुले असायला हवी, ज्यामुळे एकमेकांना कंपनी मिळते’.

सैफ-करीनाचा मुलगा तैमूर यावर्षी डिसेंबर महिन्यात चार वर्षांचा होणार आहे. 2012 मध्ये सैफ आणि करीनाचे लग्न झाले होते. त्यानंतर चार वर्षांनी तैमूरचा जन्म झाला होता. सध्या सोशल मीडियावर करीना व सैफ अली खानवर शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.