Pune News : पुणे पोलिसांच्या कोरोना कॅम्पेनिंगला करिना कपूरचा प्रतिसाद, शेअर केला व्हिडिओ

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी कोरोनावर जनजागृतीपर एक व्डिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये राज कपूर यांच्या जुन्या गाण्याच्या चालीवर कोरोना बचावात्मक सवयींचा अंगीकार करण्याचे आवाहन केले आहे. अभिनेत्री करिना कपूर हिने हा व्डिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेग धरू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झाले आहे. महाराष्ट्रात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीचा नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. तरीही नागरिकांमध्ये बेफिकीरपणा दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी जनजागृतीपर एक व्डिडिओ तयार केला आहे. या व्डिडिओसाठी मास्क घालणे व योग्य खबरदारी घेण्याची आवाहन गाण्यातून केले आहे. या गाण्यासाठी दिवगंत दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या ‘ए भाई जरा देख के चलो, आगे भी नही पिछे भी’ या गाण्याची चाल वापरण्यात आली आहे.

विशेष म्हणजे तयार केलेले मराठी गाणं एका पोलीस कर्मचा-यानेच गायले आहे. ‘ए भाई मास्क पेहन के चलो, आते भी नहीं जाते भी’ असे मराठी गाणं तयार करण्यात आले आहे. 58 सेकंदाच्या या व्डिडिओत पोलीस कर्मचारी नागरिकांना मास्क घालण्याची विनंती करताना दिसत आहेत. कोरोना साधी सुधी सर्दी खोकला नसून एक धोकादायक आजार आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटाझर यांचा नियमित वापर करून स्वछता ठेवण्याचे आवाहन गाण्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

अभिनेत्री करिना कपूर हिने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘अप्रतिम’ असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान हा व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शेअर केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.