Kareena On Her First Movie: पहाटे चार वाजता दिलेला तो आयुष्यातील पहिला शॉट…

Kareena On Her First Movie: The first shot of her life given at four in the morning वीस वर्षांपूर्वी तिने जे.पी.दत्तांची फिल्म 'रेफ्युजी'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्या चित्रपटात तेव्हाचा नवोदित अभिषेक बच्चन तिचा हिरो होता.

एमपीसी न्यूज- करीना कपूर – खानच्या बॉलिवूड प्रवेशाला आता २० वर्षे पूर्ण झाली आहेत. वीस वर्षांपूर्वी तिने जे.पी.दत्तांची फिल्म ‘रेफ्युजी’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्या चित्रपटात तेव्हाचा नवोदित अभिषेक बच्चन तिचा हिरो होता. कारकीर्दीच्या या वीस वर्षांच्या आठवणी जागवताना करीना इमोशनल झाली. तिने तिचे दिग्दर्शक, पहिला हिरो, सकाळी चार वाजता घेतलेला आयुष्यातील पहिला शॉट, आयुष्यातच पहिल्यांदाच फेस केलेला कॅमेरा याच्या सुंदर आठवणी व्यक्त केल्या.

या नंतरच्या वीस वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता करीनाच्या गाठीशी ब-याच चांगल्या वाईट चित्रपटांचा अनुभव आहे. पण वीस वर्षांपूवी पहाटे चार वाजता दिलेल्या त्या पहिल्या शॉटच्या आठवणी जागवताना करीनाने परमेश्वराचे आभारच मानले आहेत.

इन्स्टाग्रामवर या आठवणी शेअर करताना करीना लिहिते की, ‘माझा तेव्हाचा पहाटे चार वाजताचा पहिला शॉट…मी आज देखील पहाटे चार वाजता उठले, आरशात डोकावले आणि माझे मलाच सांगितले की मी घेतलेला हा सर्वोत्कृष्ट निर्णय.


वीस वर्षांच्या हा कालावधी, हार्ड वर्क, कामाप्रती समर्पण आणि आत्मविश्वास…मी माझ्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेम, पाठिंबा आणि ताकदीसाठी कृतज्ञ आहे…थॅक्यू जे. पी. दत्ता माझ्या चित्रपटजीवनाबद्दल…अभिषेक बच्चन, एक गोड को स्टार… आणि या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक छोटी मोठी व्यक्ती…परत त्या काळात जायला आवडेल…# 20YearsAndNotGivingUp..’

या सोबत तिने शेअर केलेल्या फोटोत वीस वर्षांपूर्वीची फ्रेश, नवथर करीना खूप सुंदर दिसतेय. पाण्यात हलकेच भिजलेली, चेह-यावर आलेली खट्याळ बट आणि तिने दिलेला तो भीतीचा लूक यातच करीनामधील अभिनेत्री दिसून येते.

करीनाने काही दिवसांपूर्वी अक्षयकुमार सोबत ‘गुड न्यूज’ हा चित्रपट केला होता. लवकरच ती आमीरसोबत ‘लालसिंग चढ्ढा’ आणि करण जोहरच्या ‘तख्त’ मध्ये दिसणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.