Kargil Vijay Divas 2023 : देशभरात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –  भारताचा पाकिस्तानावर विजय साजरा करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Divas 2023) साजरा केला जातो. शौर्यपूर्ण कृत्ये आणि भारतीय सैनिकांच्या अतुलनीय दृढनिश्चयाने 55 दिवसांच्या युद्धात पाकिस्तानच्या सैन्याला माघार घेण्यास आणि संरक्षण जागा रिकामी करण्यास भाग पाडले गेले होते.

Charholi : दुकानात जाऊन विनाकारण दुकानदारास मारहाण

पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेला घेऊन अलिखित कराराचे उल्लंघन करत भारतीय नियंत्रणात असलेल्या काही चौक्यांवर  कब्जा केला होता. 1999 च्या उन्हाळ्यात पाकिस्तानच्या सैन्याला हुसकावून लावण्यासाठी हे युद्ध लढले गेले होते.

दरवर्षी, कारगिल विजय दिवसानिमित्त, भारताचे पंतप्रधान नवी दिल्लीच्या इंडिया गेटजवळील अमर जवान येथे कारगिल युद्धात आपले मौल्यवान प्राण गमावलेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. भारतीय नागरिक सुद्धा सोशल मीडियाद्वारे सर्वाना शुभेच्छा व शहिदांना श्रद्धांजली देत हा दिवस साजरा करतात.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस ज्येष्ठ नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आदी राजकारण्यांनी सुद्धा कारगिल दिवस साजरा केला आहे.  सोशल मीडिया वर नागरिकांना शुभेच्छा व युद्धात शाहिद झालेल्याना श्रद्धांजली दिली आहे.

अभिनेता अक्षय कुमार, अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री निम्रत कौर,  माजी क्रिकेटपटू युवराज सिंह, आदी सलब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या असून प्रसिद्ध वालुका शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी देखील चांगले वाळू कला करून शुभेच्छा दिल्या आहेत.

कारगिल युद्धाची शौर्य आणि चाऱ्याची गाथा ही एलओसी – कारगिल, लक्ष्य, टॅंगो चार्ली,  शेरशहा, गुंजन सक्सेना,  अश्या बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांनी आपल्याला दाखवली असून, आजच्या दिवसाच्या पर्सवभूमीवर बरेच नागरिक हे चित्रपट बघून कारगिल युद्धाच्या आठवणी पुन्हा जिवंत करत माहीत.

 

https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1684016820158701570?s=20

 

https://twitter.com/akshaykumar/status/1684026834474926080?s=20

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.