Karjat : बारणे याना दिल्लीत पाठवण्यासाठी जीवाचे रान करू- रोहिदास मोरे

भर उन्हात नेरळ परिसरातील महायुतीच्या शिलेदारांची प्रचारफेरी

एमपीसी न्यूज – सलग ३० वर्ष राजकारणात असलेले आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा खासदार करून दिल्लीत पाठ्वण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू असे प्रतिपादन शिवसेनेचे नेरळ शहरप्रमुख रोहिदास मोरे यांनी आहे. नेरळमध्ये आज महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचारफेरी काढली होती. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना मोरे म्हणाले. रणरणत्या उन्हातही या प्रचाररॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

देशात १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान करण्यास अवघे ११ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आदेशाप्रमाणे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. नेरळ येथे महायुतीचे शिलेदार यांच्या वतीने आज प्रचार फेरी काढण्यात आली. डोक्यावर रणरणते ऊन, आणि भूक तहान विसरून नेरळ मधील भिताडआळी, हेटकरआळी, टेपआळी आदी भागात प्रचारफेरी काढण्यात आली. खासदार बारणे यांनी आपल्या खासदारकीच्या काळात 91 टक्के उपस्थिती लावली लोकसभेत काय चालते हे शिकून घेतले.

  • मात्र, तेथे जाऊन खुर्चीत बसण्याचे काम आपल्या खासदाराने केले नाही तर पाच वर्षात सर्वाधिक 1110 प्रश्न त्यांनी मांडले. त्यात 543 खासदार असलेल्या लोकसभेत त्यांना 289 वेळा प्रत्यक्ष प्रश्न मांडण्याची संधी त्यांना मिळाली. त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातील आणि देश पातळीवर वरील तब्बल 20 खासगी विधेयके देखील मंजूर करून घेण्याचे काम 2014 श्रीरंग बारणे यांनी केले. कार्यकर्त्यांमध्ये ते मिळून मिसळून राहिले. संपूर्ण मतदार संघात त्यांनी दांडगा जनसंपर्क ठेवला. त्यामुळे अश्या जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या आपल्या नेत्याला लोकसभेत पाठवण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख रोहिदास मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या प्रचारफेरीला शिवसेनेचे नेरळ शहरप्रमुख रोहिदास मोरे. भाजप शहराध्यक्ष अनिल जैन, नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी साळुंके, पंचायत समिती सदस्य सुजाता मानवे, शिवसेनाचे बंडू क्षीरसागर, किसान शिंदे, ग्रामपंचात सदस्य प्रथमेश मोरे, भाजपचे मिलिंद साने, प्रवीण पोलकम, भाजप महिला आघाडीच्या रायगड उपाध्यक्षा मृणाल खेडकर, वर्षा बोराडे, समिधा टिल्लू,यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

  • महायुतीच्या जाहीरनाम्याचे वाटप
    नेरळप्रमाणेच आजूबाजूच्या गावांमध्येही प्रचाराचा झंजावात सुरु झाला आहे. धामोते येथे शिवसैनिकांनी जमून ग्रामदेवाला नतमस्तक होत प्रचाराचा नारळ फोडला आहे. धगधगत्या सूर्याची पर्वा न करता प्रचाराचे रान उठवले आहे. घराघरात महायुतीच्या जाहीरनाम्याचे वाटप करून आपले मत विकासाला, आपले मत महायुतीला हा नारा दिला आहे. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश विरले, दिनेश कालेकर, देवा पेरणे जेष्ठ शिवसैनिक दत्ता विरले, नाना विरले, तसेच शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून गाव पिंजून काढला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.