-MPC-TOP-MOST-BANNER-I

Karla News : कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व तमाम कोळी, आग्री, सिकेपी आणि सोनार समाजाची कुलस्वामिनी कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या मंदिरात आज, शनिवारी पहाटे विधीवत देवीचा अभिषेक करत घटस्थापना करण्यात आली. तसेच देवस्थान प्रशासकीय समिती, पुजारी, गुरव व भाविकांच्या उपस्थितीमध्ये देवीची सकाळची आरती संपन्न झाली.

लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी कार्ला गडावर आईचा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने संपन्न होतो. यावर्षी कोरोना या वैश्विक महामारीच्या संकटामुळे अद्याप महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने बंद असल्याने कार्ला गडावर प्रशासकीय समितीच्या आवाहनाप्रमाणे व नोंदणी झालेल्या तीन भाविक दांम्प्त्यांच्या हस्ते देवीचा अभिषेक पार पडला.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

यानंतर प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय मुळीक, वेहेरगावचे सरपंच चंद्रकांत देवकर, पुजारी संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विजय देशमुख, अभिषेकाचे आजचे मानकरी चंद्रकांत देवकर यांच्यासह सुनिल पाटील, रविंद्र भोईर, संजय देवकर, पोलीस पाटील अनिल पडवळ व इतर गुरव प्रतिनिधी यांच्या हस्ते देवीचे घट बसविण्यात आले.

देवस्थाने बंद असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागातील काही भाविक मध्यरात्रीपासून मंदिराच्या प्रवेशद्वाजवळ येऊन बसले होते. पहाटेपासून गड पायथ्याजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राज्यात सर्वत्र कोरोनाचे संकट असल्याने नवरात्र उत्सवात मंदिर हे भाविकांसाठी बंदच आहे. ज्या भाविकांनी अभिषेकासाठी अगाऊ नोंदणी केली आहे. त्यांना पहाटे गडावर प्रवेश दिला जाणार आहे. याची भाविकांनी नोंद घ्यावी तसेच तांत्रिक अडचणी दूर करत दोन तीन दिवसात देवीची आरती लाईव्ह दाखविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय मुळीक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.