BNR-HDR-TOP-Mobile

Karla : पार्थ पवार यांनी घेतले एकविरा देवीचे दर्शन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- कार्ला गडावरील एकविरा देवीचे आज मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी दर्शन घेतले.

मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदार संघ व रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल हे विधानसभा मतदार संघ येतात. रायगड जिल्ह्यात एकविरा देवीवर श्रध्दा असणारा मोठा वर्ग असल्याने व मतदार संघातील एकविरा हे जागृत देवस्थान असल्याने पार्थ पवार यांनी आज सकाळी नऊ वाजता कार्ला गडावर येऊन एकविरा देवीची पूजा करत दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सचिव उमेशदादा पाटील, मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, संत तुकाराम सह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, गणेश खांडगे, किशोर भेगडे, युवकचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, सुनील दाभाडे, सुभाष जाधव, संतोष भेगडे, राजु देवकर, बाबाजी कुटे, शोभा कदम, साहेबर‍ाव कारके, रेश्मा देवकर, आनंद पडवळ, तानाजी पडवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.