Karla : एकविराआईच्या आशीर्वादाने महायुतीचाच विजय होईल – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी घेतले एकविरा देवीचे सपत्नीक दर्शन

एमपीसी न्यूज – येत्या निवडणुकीत शिवसेना पक्ष भाजप, रिपाइ, रासप, रयत क्रांती संघटनेची महायुती झाली आहे. महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यात महायुतीचाच विजय होणार आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी कार्ला येथील एकविरा देवीचे आज (बुधवारी) सपत्नीक दर्शन घेतले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देवीचे दर्शन घेत यश देण्याचा आशीर्वाद मागितला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख मावळ गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजू खांडभोर, शरद हुलावळे, नगरसेवक सचिन भोसले, उपजिल्हा प्रमुख बाळा ठाकूर, अनिकेत घुले, धनंजय नवघणे, अनंता हुलावळे, कल्पना आखाडे, सिंधु परदेशी, मनीषा भांगरे, ढबळू ठोंबरे, एकनाथ जांभूळकर, सोमनाथ कोंडे, जयदास ठाकर आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “कुठलंही काम करताना एकविरा देवीचा आशीर्वाद घेण्याची आमची परंपरा आहे. आईचे आशीर्वाद घेतल्यावर यश मिळते हा अनुभव आहे. येत्या निवडणुकीत एकविराआईच्या आशीर्वादाने महायुतीच्या उमेदवारांना यश मिळणार आहे.”

खासदार बारणे म्हणाले, “पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकविरा देवीचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी आईचा आशीर्वाद घेतला आहे. यामुळे या निवडणुकीत महायुतीलाच यश मिळणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील सर्व नागरिक योग्य उमेदवाराला निवडून देणार आहे. त्यांच्या मनातील उमेदवार हा महायुतीचाच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.