Karla : ..तर एकट्या मला पाडण्यासाठी दोन मुख्यमंत्री आणण्याची गरज पडली नसती – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री यांनी तालुक्यात 1400 कोटी रुपये निधी आणून खरोखरच मावळ तालुक्यात विकास केला असता तर माझ्या सारख्या एकट्या कार्यकर्त्याला निवडणुकीत पाडण्यासाठी त्यांना दोन-दोन मुख्यमंत्री आणायची गरज पडली नसती, अशी टिप्पणी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी केली.

नाणे मावळात वेहेरगाव येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, मावळ तालुका खरेदी- विक्री संघाचे माजी सभापती बाळासाहेब भानुसघरे, पंचायत समिती सदस्य महादू उघडे, नाणे मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजू देवकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिलाटणे, दहिवली, कार्ला, वाकसा़ई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, कुसगाव या गावांमधील ग्रामस्थांशीही शेळके यांनी संपर्क साधला.

आपल्या घणाघाती भाषणात शेळके यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली. गेल्या दहा वर्षांत त्यांनी तालुक्यात विकासकामे केली असती तर मावळची जनता माझ्या नाही तर त्यांच्या पाठीशी उभी राहिली असती.

मावळच्या जनतेने आपल्याला विधानसभेत पाठवून फक्त एक संधी द्यावी, असे आवाहन शेळके यांनी मतदारांना केले. आपण इतरांसारखी फक्त आश्वासन देणार नाही. एकविरा देवस्थानचा विकास अनेक वर्षें रखडला आहे. देवीच्या गडाच्या पायऱ्यांची खूपच दूरवस्था झाली आहे. भाविकांसाठी सुविधांचा अभाव आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासन दिली, मात्र काहीच कामे झाली नाही. वेहेरगाव येथील सर्व दुकानदाराच्या रोजीरोटीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवू हे आपण खात्रीने सांगतोय कारण येथील दुकानदार दुकाने कधीही तुटतील या दहशतीखाली कायम असतात, असे शेळके म्हणाले.

तालुक्यातील महिलांची दोन लाख रुपयांची विमा पॉलिसी काढण्याच्या भाजपच्या योजनेची शेळके यांनी खिल्ली उडवली. आम्हाला दोन लाख रुपयांपेक्षा आमच्या माता-भगिनींचा जीव अधिक प्रिय आहे. त्यामुळे अशा फसव्या योजनांना मावळची जनता बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझ्या माता-भगिनीना निरामय व उदंड आयुष दे, असे साकडे शेळके यांनी आई एकविरा देवीला घातले.

वेहेरगावमध्ये अशोक म्हाळस्कर राजू हुलावळे, राजू देवकर, संजय देवकर, शरद कुटे, संतोष गायकवाड, नागेश बोरकर, संतोष रसाळ, मंगेश रसाळ भाऊ पवार, विशाल माने, सागर देवकर, श्रीरंग पडवळ, चंद्रकांत देवकर, सागर देवकर, निलेश बोरकर, साईनाथ देवकर, मयूर तिकोणे, कुलदीप देवकर, चंद्रकांत बोरकर, जय कुटे, बाळू बोरकर, राम बोरकर, पवन गायकवाड, पप्पू गायकवाड यांनी, शिलाटणे येथे तानाजी भानुसघरे, गणपत भानुसघरे, संभाजी भानुसघरे, अतुल भानुसघरे, ज्ञानदेव भानुसघरे, अनिल भानुसघरे, नंदूमोरे, हेमंत भानुसघरे, प्रदीप भानुसघरे,पांडुरंग भानुसघरे संतोष भानुसघरे, रामदास भानुसघरे, पिंटू शेळके, दत्ता भानुसघरे, सुनील कोडंभर, वसंत भानुसघरे, अंकुश भानुसघरे, बाबाजी भानुसघरे, सचिन भानुसघरे, कैलास भानुसघरे यांनी, दहीवली येथे भाऊसाहेब मावकर, श्याम गायकवाड, विष्णू मावकर शांताराम मावकर, शंकर पडवळ, हनुमंत मोरे, स्वप्नील पिंगळे, गणपत येवले, योगेश पडवळ, गुरुप्रसाद पडवळ, तानाजी पडवळ, स्वप्नील पडवळ, नीलेश पडवळ, चंद्रकांत करवंदे , सोपान पडवळ किरण पडवळ, विशाल येवले, अंकुश येवले, रूपेश येवले, संदीप केदारी यांनी, कार्ला येथे किरण हुलावळे,सुनील शिर्के, कैलास हुलावळे, सुखदेव हुलावळे, नंदू हुलावळे, अंकुश गायकवाड, रवी गायकवाड, सुरेश जाधव, सुनिल सावळे, नितिन वाडेकर, संतोष केदारी विशाल जमदाडे, सचिन डिमळे, अमोल वायकर, विष्णू हुलावळे यांनी शेळके यांचे स्वागत केले.

सुनीलआण्णा यांच्या स्वागतासाठी पावसाची तमा न बाळगता वरसोली येथे भर पावसातही महिला रस्त्यावर थांबल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.