Karla : एकविरा गडावर पालखी सोहळ्यासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कार्ला येथे एकविरा देवीचा पालखी (Karla) सोहळा सुरु आहे. या सोहळ्यासाठी पनवेल येथून आलेल्या एका भाविक महिलेच्या गळ्यातील एक लाख 20 हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 15) सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Talegaon: सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात आढळले एक दिवसाचे अर्भक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ला येथे एकविरा गडावर देवीचा (Karla) पालखी सोहळा सुरु आहे. पालखी सोहळ्यासाठी पनवेल तालुक्यातील करंजजाडे येथून फिर्यादी महिला आल्या होत्या. पालखी सोहळ्याच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.