Karmaveer bhaurao Patil : रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी 

एमपीसी न्यूज : रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer bhaurao Patil) यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला संस्थापक/अध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी संस्थापक धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले कि, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे व त्यांच्या कमवा व शिका या संकल्पनेमुळे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नव्हते ज्यांची परिस्थिती हलाखीची होती. अशी मुले आज मोठ्या मोठ्या पदावरती काम करत आहेत.(Karmaveer bhaurao Patil) भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष झालेला आहे व आशिया खंडात आज सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ती नामांकित आहे. रयत विद्यार्थी विचार मंच संस्था देखील कर्मवीरांच्या पाऊलावर पाऊल ठेवत काम करेन. व गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक न्याय हक्कासाठी काम करेल.

Central Railways : मध्ये रेल्वेचा तिकीट तपासणी महसूल 150 कोटी पार

यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे,प्रदेश सहसचिव भाग्यश्री आखाडे,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयूर जगताप, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष समाधान गायकवाड, पिंपरी चिंचवड सचिव प्रगती कोपरे, पिंपरी चिंचवड शहर समन्वयक प्रमोद लोंढे, सदस्य अक्षय गायकवाड उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.