Karnataka Crime : थेट कोर्टात पत्नीची हत्या; सुखी संसाराच्या शपथा घेऊन क्षणार्धात संसाराचा अंत

एमपीसी न्यूज : कर्नाटकामध्ये (Karnataka Crime) पतीने कोर्टातच आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दाम्पत्यांनी काही वेळापूर्वीच पुन्हा नव्याने मुलांसाठी सुखी संसार करण्याची शपथ घेतली होती. पण काही वेळातच पतीच्या अशा हल्ल्याने हा संसार कायमचा उधळला गेला.

पती शिवकुमार आणि पत्नी चैत्र यांनी एकमेकांसोबत न राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी कर्नाटकातील होलेनरसीपुरा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांचे काऊंसिलिंग सेशन झाले. यामध्ये त्यांचे मनपरिवर्तन झाले. आणि त्यांनी आपल्या मुलांसाठी सुखी संसार करण्याच्या शपथ घेतल्या. काही वेळाने पत्नी चैत्र बाथरूमला जात असताना पती शिवकुमारने मागून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये त्याने तिचा गळा चिरला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तेथील लोकांनी त्याला पकडून दिले.

पोलिसांनी याबाबत सांगताना म्हंटले आहे, कि न्यायालयात (Karnataka Crime) शस्त्र आले कसे? याचा तपास करत आहोत. पत्नीवर घाव एवढ्या खोलवर लागला, कि पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवकुमार पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरु आहे.

MPC News Anniversary Special : वाचा एमपीसी न्यूज वर्धापनदिन विशेषांक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.