Silicon Statue Of Wife: आधुनिक सत्यवानाने बनवला सावित्रीचा हुबेहूब पुतळा

Karnataka Industrialist installs lifelike statue of deceased wife in their dream home स्वतःच्या कल्पनेप्रमाणे घर बांधून त्या नव्या घरात थाटात प्रवेश करावा, असे माधवींचे स्वप्न होते.

एमपीसी न्यूज- नवरा आणि बायको हे नातं म्हणजे टॉम अँड जेरी सारखं असतं. नावाप्रमाणेच जेरीला आणणारा जेरी आणि त्याच्या खोड्यांनी गांजलेला टॉम. मात्र यात रुसवेफुगवे असले तरी तितकेच प्रेमदेखील असतेच. पती पत्नीचे वाद होताना पत्नी नेहमीच म्हणते की, आत्ता तुम्हाला माझी किंमत कळत नाहीये, मी गेल्यावरच ती कळेल. यातील गमतीचा भाग सोडून दिला तरी कर्नाटकातील एका उद्योजकाने आपल्या दिवंगत पत्नीचा हुबेहूब पुतळा आपल्या नव्या घरात कायमस्वरुपी बसवला आहे.

कर्नाटकचे उद्योजक श्रीनिवास गुप्ता यांनी दिवंगत पत्नी माधवी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा हुबेहूब पुतळा उभारला आहे. नव्या घरात प्रवेश करण्याआधी या प्रतिमेस झोक्यावर बसवले. सोहळ्यात मित्रपरिवार आला असताना भरजरी साडी व सोन्याचे दागिने घालून झोक्यावर बसलेल्या माधवींना पाहून सर्व चक्रावून गेले. मात्र सत्य समोर आल्यानंतर ते श्रीनिवास यांच्या पत्नीप्रेमाने भारावून गेले.


स्वतःच्या कल्पनेप्रमाणे घर बांधून त्या नव्या घरात थाटात प्रवेश करावा, असे माधवींचे स्वप्न होते. मात्र जुलै 2017 मध्ये एका रस्ते अपघातात माधवींचा मृत्यू झाला.

या विषयी बोलताना गुप्ता म्हणाले, पत्नीविना हे घर सुने सुने राहिले असते. यामुळे तिच्या पुतळ्याची कल्पना आली. आता ती प्रत्येक क्षणी समोर असल्यासारखी वाटते. बंगळुरुचे शिल्पकार श्रीधर मूर्ती यांनी सिलिकॉनच्या माध्यमातून हा पुतळा घडवला आहे.

खरंतर अशा प्रकारचे पुतळे वॅक्सपासून बनवले जातात. इंग्लंडमधील मादाम तुस्सॉ म्युझियम यासाठी प्रसिद्ध आहे. पण माधवी यांचा हा पुतळा खास सिलिकॉनपासून बनवण्यात आला आहे.

कारण गुप्ता कर्नाटकातील ज्या भागात राहतात तेथे प्रचंड उन्हाळा असतो. तेव्हा हा पुतळा वितळू शकतो. म्हणून तो सिलिकॉनपासून बनवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.