Dehuroad: कर्तव्य फाऊंडेशनतर्फे फराळ वाटप

एमपीसी न्यूज – आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळीचा सण साजरा करणे शक्य नसलेल्या  कुटुंबांना देहूगाव येथील कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या सदस्यांनी या कुटूंबांबरोबर दिवाळीही साजरी केली.

दिवाळीनिमित्त देहूगाव, येलवाडी, सांगुर्डी, सुदुंबरे, झेंडेमळा, माळवाडी, विठ्ठलवाडी, चिखली या भागातील गरजू कुटुंबांना त्यांच्या घरी जावून फराळ देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मासिक राशन योजना, नेत्र तपासणी शिबीर, गोर-गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आरोग्य तपासणी असे अनेक  समाजउपयोगी उपक्रम राबिवण्यात येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.