Kartiki Gaikwad: ‘लिटिल चॅम्प्स’ कार्तिकी गायकवाड अडकणार विवाहबंधनात

Kartiki Gaikwad: 'Little Champs' Karthiki Gaikwad to get married कार्तिकी गायकवाड हिचा जोडीदार होणाऱ्या रोनीत भिसे यालाही संगीताची आवड आहे. तो तबला वाजवतो

एमपीसी न्यूज – आपल्या गोड आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या कार्तिकी गायकवाड आता आयुष्याची दुसरी इनिंग खेळण्यास सज्ज झाली आहे. रोनीत भिसे या तरुणाशी तिचा साखरपुडा झाला आहे. 
सारेगमप या रियालिटी शोमधून कार्तिकी गायकवाड महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. रियालिटी शो मध्ये तिने गायलेल्या ‘घागर घेऊन… घागर घेऊन..’ या गौळणीने तर तिने रसिकांच्या मनावर राज्य केले. या गाण्याला मिळालेल्या यशानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.
दरम्यान ज्या तरुणाशी तिचा साखरपुडा झाला तो रोनित भिसे इंजिनिअर असून कार्तिकीचे बाबा कल्याण गायकवाड यांच्या मित्र परिवारातील भिसे कुटुंबीय आहेत.
कार्तिकी गायकवाड हिचा जोडीदार होणाऱ्या रोनीत भिसे यालाही संगीताची आवड आहे. तो तबला वाजवतो. तबल्याचा तीन परीक्षा देखील त्याने पास केल्याची माहिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.