गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Karve Road Accident : कर्वे रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील कर्वे रस्त्यावरील (Karve Road Accident) शाळा चौकात सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणारी दुचाकी सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकवर आदळल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. 
मनोज रमेश पाटील (वय 23 रा. बाणेर), नितीन बालाजी मगर (वय 19, रा. बिबवेवाडी) अशी मृत्यु झालेल्या युवकांची नावे आहेत. याप्रकरणी अधिक माहिती अशी, की मनोज पाटील आणि नितीन मगर हे दोन तरुण दुचाकीने कर्वे रस्त्यावरून निघाले होते. भरधाव वेगात जात असताना त्यांची दुचाकी वैद्यराज मामा गोखले चौकात (रसशाळा) सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि दुचाकीची धडक दिली. या अपघातात पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी झाल्याने मगरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात सिमेंट मिक्सर (Karve Road Accident) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश मोेरे करत आहेत.
Latest news
Related news