Karvenagar : एनडीए रस्त्यावरील रहदारी कमी होणार : आमदार भीमराव तापकीर

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 31 मधील कर्वेनगर तिरुपती नगर ते डुक्करखिंड हा डीपी रस्ता तयार होणार आहे. त्यामुळे कर्वेनगर – एनडीए रस्त्यावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे आमदार भीमराव तापकीर म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वारजे हायवे चौक परिसरात सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती सुटण्यास या रस्त्यामुळे मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

कर्वेनगरमधील तिरुपतीनगर ते डुक्करखिंड या डीपी रोडच्या 5 कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी सायंकाळी झाला. हे काम नगरसेवक राजेश किसन बराटे यांच्या प्रयत्नातून करण्यात येत आहे. यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक राजेश बराटे, सुशील मेंगडे, नगरसेविका दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बराटे, वासुदेव भोसले, विठ्ठल पासलकर, वसंत कुल, दिवाकर पोफळे, दत्ता चौधरी, संजय वाल्हेकर, निवृत्ती एनपुरे, माऊली ठाकर यावेळी उपस्थित होते.

स्वारगेट, हडपसर, बिबवेवाडी, कोथरूड, राजाराम पूल परिसरात जाण्यासाठी या पर्यायी रस्त्याचा वापर होणार आहे. या रस्त्यासाठी सध्या 5 कोटी रुपये बजेट लागले असून आणखी 5 कोटी आवश्यक असल्याचे नगरसेवक राजेश बराटे यांनी सांगितले. या भागातील नागरिकांना उत्तम असा जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

या डीपी रस्त्यामुळे अर्ध्या तासाचे अंतर आता केवळ 5 मिनिटांत पार करता येणार आहे. 2000 सालापासून या रस्त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सांगितले. हिल व्ह्यू सोसायटी ते तेजोवलय, शिप्ला हॉस्पिटल आणि शनी मंदिर ते तिरुपतीनगर दरम्यान रस्ता तयार केला आहे. त्याचा डोंगरालगतच्या सोसायट्यांना फायदा होणार असून, सर्व्हिस रस्त्यांवरील ताण कमी होणार असल्याचे नगरसेविका दीपाली बाबा धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.