Kasba Bye Election : हेमंत रासने यांना भाजपची उमेदवारी जाहीर

एमपीसी न्यूज -कसबा  विधानसभेच्या (Kasba Bye Election )पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी हेमंत रासने यांना जाहीर झाली आहे.

PCMC : शिवजयंतीनिमित्त पालिकेतर्फे विविध कार्यक्रम

आमदार  मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपा कडे अनेक इच्छूकांची नावे समोर येत होती. त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, आज ही उत्सुकता समाप्त झाली असून, कसब्यातून हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.भाजपा पार्लिमेंटरी बोर्डाकडून ट्विट करुन ही माहिती देण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.