Kasarsai : बिबट्याने पळवले कुत्र्याचे पिल्लू; गावात दहशतीचे वातावरण

एमपीसी न्यूज : बिबट्याने काल कासारसाईमध्ये (Kasarsai) बंगल्या बाहेरील पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला नेल्याने गावातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.

स्थानिक रहिवासी सचिन गायकवाड म्हणाले, की ”भगवंत लॉन्सजवळ बिबट्या दिसला होता. त्याने एक पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन गेल्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून दिसत आहे. त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी व कामगार शेतामध्ये सकाळी 7 – 8 वाजेच्या नंतर पूर्ण सूर्यप्रकाश दिसत असल्यावरच कामासाठी जातात. तसेच, ते शेतातून दिवस मावळण्यापूर्वी घरी जातात. रात्रीचे पिकांना पाणी द्यायला जाणे बंद केले आहे.”

बिबट्याने पळवलेले कुत्र्याचे पिल्लू
बिबट्याने पळवलेले कुत्र्याचे पिल्लू

Avishkar : मॉडर्न महाविद्यालयात ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न

बिबटयाबाबत विचारल्यानंतर, हनुमंत जाधव (वन अधिकारी, वडगाव मावळ) म्हणाले, की ”त्यांनी वनविभागाच्या (Kasarsai) कर्मचाऱ्यांसोबत गावामध्ये पाहणी केली. बिबट्याचे ठसे आढळल्यामुळे बिबट्याचे हल्ले होऊ नयेत, या संदर्भात काळजी घेण्यासाठी जनजागृती केली आहे. लोकांना सांगण्यात आले आहे, की त्यांनी एकट्याने रात्री फिरू नये. तीन चारजण एकत्र फिरावे व सोबत काठी ठेवावी, टॉर्च ठेवावा व मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात गाणे लावावीत. यामुळे बिबट्या जवळ येणार नाही. पाळीव प्राणी जसे गाय, म्हैस, बैल, बकऱ्या या बंदिस्त गोठ्यात ठेवाव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.