Kasarwadi : घरासमोर सायकल लावण्याच्या वादातून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – सायकल लावण्याच्या किरकोळ वादातून एकावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. 21) रात्री अकराच्या सुमारास कासारवाडी परिसरात घडली.

मल्लेश हणमंता बमनाळे (वय 38, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आदम मैनु सिंदगी (रा. कासारवाडी) याच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मल्लेश आणि आरोपी आदम शेजारी राहत आहेत. बुधवारी रात्री त्यांच्यात घरासमोर सायकल लावण्याच्या कारणाहून वाद झाला. या वादातून आरोपी आदम याने घरात ठेवलल्या कोयत्याने मल्लेश यांच्या कपाळावर वार केला. यामध्ये मल्लेश जखमी झाले आहेत. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.