Kasarwadi Crime News : दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवून साडे बारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दहा टक्के परतावा करण्याचे आमिष दाखवून कोणताही परतावा न देता साडे बारा लाखांची फसणूक करण्यात (Kasarwadi Crime News) आली आहे. हा प्रकार 17 मार्च 2021 ते आज अखेर या कालावधीत कासारवाडी येथे घडला.

अफरोज मेहबूब शेख (वय 36 रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोष जयसिंग पवार (वय 45 रा.लोहगाव) व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad Crime News : अश्लील हावभाव करून विनयभंग करणाऱ्या व्यावसायीकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी गुरुदेव मल्टी फर्म याद्वारे ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. यामध्ये 10 टक्के आकर्षक परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन करून 16 लाख 60 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यातले केवळ 4 लाख रुपये परत केले व 12 लाख 60 हजार रुपयांची फसणूक केली. तसेच इतर चार जणांची मिळून अशी 23 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास (Kasarwadi Crime News) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.