Kasarwadi Crime News : … म्हणून रिक्षाचालकाने फोडली एसटी बसची काच

एमपीसी न्यूज – ओव्हरटेक करू दिले नाही याचा राग आलेल्या रिक्षाचालकाने एसटी बसवर दगड मारून बसची पुढची काच फोडली. कासारवाडी येथे शुक्रवार (दि.8) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी रिक्षाचालक रामकिसन विरोचन गमे (वय 21, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मुळगाव परभणी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस चालक शरद बबन परभणे (वय 29, रा. विरेंद्रनगर, पालघर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बस चालक  हे पालघर ते पुणे (एम एच 14/ बीटी 4917) ही बस चालवत होते. पुणे मुंबई महामार्गावर बस चालकाने रिक्षा चालकाला ओव्हरटेक करू दिला नाही.

त्यामुळे चिडलेल्या (एमएच 12/ जेएस 8292) या रिक्षाच्या चालकाने कासारवाडी येथे बसवर दगड फेकून मारले. दगडाच्या मा-यात बसच्या पुढच्या बाजूची काच फुटली. त्यात बसचे 25 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक डी. जे. साबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.